Prithviraj Chavan : महाराष्ट्राला दहशतीचे राज्य नको, तर कायद्याचे राज्य हवे आहे; पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारवर टीका
अभिनेता टायगर श्रॉफ आणि पुणे जिल्ह्यातील बारामतीतील व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

Prithviraj Chavan : अभिनेता टायगर श्रॉफ आणि पुणे जिल्ह्यातील बारामतीतील व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राला दहशतीचे राज्य नको, तर कायद्याचे राज्य हवे आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
रविवारी एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटना राज्यातील खालावलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचे दर्शन घडवतात, असे चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
टायगर श्रॉफवर झालेला हल्ला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीमधील गोळीबाराची घटना सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करते, असेही त्यांनी नमूद केले.
गुन्हेगारांच्या हातात बंदुका आहेत, तर सरकारकडे केवळ आश्वासने आहेत, असे म्हणत त्यांनी राज्याच्या गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. गुन्हेगारांना आता कायद्याची भीती उरलेली नाही आणि लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची, या घटनांमागील सूत्रधारांचा शोध घेण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी केली.






