Pune News : रमजान ईदनिमित्त पुण्यातील ‘या’ चौकातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
Pune News: रमजान ईदनिमित्त शनिवारी (२१ मार्च) लष्कर भागातील ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण करण्यात येणार आहे.

Pune News : रमजान ईदनिमित्त शनिवारी (२१ मार्च) लष्कर भागातील ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण करण्यात येणार आहे. सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत लष्कर भागातील गोळीबार मैदान चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.Pune News
‘गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदान येथे रमजान ईदनिमित्त नमाज पठणासाठी मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी होते. यापार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. Pune News
गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारी जड वाहने ही पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबा नाला चौकातून वानवडी, लुल्लानगर चौकातून इच्छितस्थळी जातील. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेट किंवा शहरात येणाऱ्या वाहनांनी भैरोबा नाला चौकातून एम्प्रेस गार्डन, घोरपडीमार्गे इच्छितस्थळी जावे. लष्कर भागातील मम्मादेवी चौक ते गोळीबार चौक दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.Pune News
सीडीओ चैाकातून गोळीबार मैदानकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. गोळीबार मैदान चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौकातून नेपियर रस्तामार्गे बिशप स्कूल या रस्त्याचा वापर करावा. खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळण्यास तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे.
स्वारगेटकडून सोलापूर रस्त्याने हडपसरकडे जाणाऱ्या वाहनांनी शंकशेठ रस्त्यावरील चिमणराव ढोले पाटील चौकातून (सेव्हन लव्हज चौक) गुलटेकडी मार्ग सॅलिसबरी पार्क चौकाकडे जावे. खटाव बंगला चौकातून नेपियर रस्त्याने सोलापूर रस्त्याकडे जावे.
खटाव बंगला चौकातून लुल्लानगरमार्गे वाहने सोलापूर रस्त्याकडे जातील. सोलापूर बाजार पोलीस चौकी ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.






