Pune News : खराडीकरांचे पाण्यासाठीचे उपोषण तात्पुरते स्थगित
खराडी हाउसिंग सोसायटी वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषणास पुणे महानगरपालिकेच्या (Pune News) वतीने पाणीपुरवठ्यासंदर्भात हमी देण्यात आल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

Pune News : खराडी हाउसिंग सोसायटी वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषणास पुणे महानगरपालिकेच्या (Pune News) वतीने पाणीपुरवठ्यासंदर्भात हमी देण्यात आल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे (Pune News) आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक शैलेश बनसोडे, नगरसेवक सुरेंद्र पठारे यांच्या समवेत नागरिक व प्रशासकीय प्रमुखांनी हमी देऊन उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
पंधरा दिवसात सर्वे नंबर ५८ येथील सर्व तीन टाक्या पूर्ण क्षमतेने दररोज भरण्यात येतील. पुढील एक महिन्यात सर्वे नंबर ३८ येथील पाण्याची टाकी कार्यान्वित करून सर्वे नंबर ५८ चा पाणीपुरवठा (Pune News)वाढवणे बाबत नियोजन करण्यात येईल.४ मे पासून व्यापारी वापराचा नळ जोडाचा सर्वे करून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येईल.
सर्व नियोजन करून खराडी सोसायटी मधील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यात येईल अशी हमी देण्यात आल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे वीरेंद्र केळकर, एकनाथ गाडेकर, सुनील मोहिते, नितीन जाधव, श्रीपाद जाधव, दीपक पाटील, मनोज दुधानकर, प्रवीण झोरे, हर्षल घाडगे, प्रीतम सिंग, किरण पळसे, अभिषेक कुमार, राहुल परमार, सुनील जगताप, पुरुषोत्तम सर आदी मान्यवर उपस्थित होते.
खराडी हाऊसिंग सोसायटी वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने पाण्याच्या मागणीसाठीचे साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. पुणे मनपाकडून आमदार बापूसाहेब पठारे, सुरेंद्र पठारे, व यांच्या साथीने नागरिकांना हमी देऊन उपोषण प्रशासनाच्या समोर स्थगित करण्यात आले आहे. या पुढील काळात खराडीकरांना पाण्याची उपलब्धता होण्यासाठी पाठपुरावा (Pune News) करण्यात येईल. नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार.
शैलेश बनसोडे
नगरसेवक, पुणे मनपा






