Pune News | धरण परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस ; खडकवासल्यातून १४ हजार क्युसेकने विसर्ग

प्रभात वृत्तसेवा
पुणे – खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या क्षेत्रात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळपर्यत जोरदार पाऊस पडल्याने पाणीपातळीत मोठी वाढ झाली. यामुळे पानशेत, वरसगाव आणि टेमघर तीन धरणातून विसर्ग सुरू केला. हे पाणी खडकवासला धरणात जमा होत असल्याने खडकवासला धरणातून दिवसभरात विसर्गामध्ये टप्प्याटप्याने वाढ केली. सोमवारी सकाळी १० ला १४ हजार ५४७ क्युसेकने पाणी सोडले.
पावसाचा जोर कमी झाल्याने दुपारी पाचला ५ हजार ८६३ क्युसेकने पाणी सोडले जात होते. गेल्या २४ तासांत खडकवासला धरणात ६६ मिमी, पानशेतमध्ये ५९ मिमी, वरसगावमध्ये ७७ मिमी आणि टेमघर धरणात ५० मिमी पावसाची नोंद झाली. सध्य पानशेतमधून १२०० क्युसेक, वरसगावमधून ६०० आणि टेमघरमधून ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
धरणाचे नाव – पाणीसाठा- टक्के..
-खडकवासला – 1.87 टीएमसी – 94.79 टक्के
-पानशेत – 10.65 टीएमसी – 100 टक्के
-वरसगाव – 12.82 टीएमसी -100 टक्के
-टेमघर – 3.71 टीएमसी – 100 टक्के
-एकूण – 29.04 टीएमसी – 99.64टक्के





