पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) लेडीज विंग (JLW) पुणेच्या २०२५–२६ या कार्यकाळासाठी नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून, संघटनेला नव्या ऊर्जा, दृष्टीकोन व नेतृत्वाची जोड मिळाली आहे. या कार्यकाळासाठी एकता भन्साळी यांची अध्यक्षा पदा साठी निवड करण्यात असून पूजा राठोड मुख्य सचिव पद भूषवतील. त्याचबरोबर रीता जैन सचिव वंदना राठोड खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत एक समर्पित व दूरदृष्टी असलेली समितीही कार्यरत होणार आहे. जितो लेडीज विंग कडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी , सामाजिक व व्यावसायिक प्रगतीसाठी तसेच महिलांच्या सकारात्मक भविष्यासाठी नवे उपक्रम राबवले जातात. नवनिर्वाचित अध्यक्षा एकता भन्साळी यांनी सांगितले की जितो लेडीज विंग पुणे ही फक्त एक संस्था नसून, ती महिलांच्या प्रगतीची चळवळ आहे. आमच्या कार्यकाळात आम्ही महिलांना सबलीकरणाच्या नव्या संधी देऊ, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवू आणि संघटनेला नवे यशोशिखर गाठण्यास प्रवृत्त करू. समितीतील सहकाऱ्यांचा उत्साह आणि सदस्यांचा विश्वास हेच आमचे खरे बळ आहे. आम्ही सर्व मिळून हा कार्यकाळ ऐतिहासिक घडवू, असा मला दृढ विश्वास आहे मला आहे. जितो संस्थेच्या निवेदनातही नमूद करण्यात आले की, नवीन नेतृत्वाखाली जितो लेडीज विंग पुणे भविष्यातही “सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक उत्कृष्टता आणि महिलांच्या प्रगती” या तिन्ही आघाड्यांवर लक्षणीय ठसा उमटवेल.