Pune News : विमाननगरमधील अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा
विमाननगर येथील ॲटलान्टिस रुफ टॉप लाऊंज हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या (Pune News) अमली पदार्थ विरोधी दोनच्या पथकाने छापा टाकला.

Pune News : विमाननगर येथील ॲटलान्टिस रुफ टॉप लाऊंज हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या (Pune News) अमली पदार्थ विरोधी दोनच्या पथकाने छापा टाकला. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात हुक्का विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी, पोलिसांनी हॉटेल मालक, मॅनेजर, वेटरसह सात जणांना पकले असून, त्यांच्या विरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा (Pune News) दाखल केला आहे. यावेळी हॉटेलमधून हुक्का पॉट, विदेशी दारुच्या बाटल्या, व इतर साहित्य असा 1 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्वप्निल शांताराम तांबे (वय.32), अमेय मुकेश अजमीरे (वय.28,राहणार दोघे वाघोली), नवरंग विठ्ठलराव कोल्हे (वय.28,रा.विमाननगर), अमितकुमार दयालजी गोयल (वय.26), कमरुल इस्लाम लष्कर (वय.26), शिवमकुमार श्रीरामराज यादव (वय.23), माहरुफ अफताफउद्दीन आलम (वय.18,राहणार सर्वजण खराडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कोम्बिग ऑपरेशनच्या पार्श्र्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी पथक दोन गस्तीवर होते. त्यावेळी ॲटलान्टिस या हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिस उपायुक्त (Pune News) गुन्हे निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शऩाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीन नाईक, कर्मचारी राजेस शेख, पृथ्वीराज पांडुळे, संदीप देवकाते, दिनेश बास्टेवाड, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, वैशाली माकडी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.






