Pune News : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Updated On:
Pune News : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागात घडली. हर्षद दीपक बर्गे (वय २५, रा. सदर बाजार, सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत ऋषिकेश धोत्रे (वय २६, रा. सदर बाजार, सातारा) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार हर्षद शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव वेगात कात्रज परिसरातून निघाला होता.

मोरे बाग परिसरात दुचाकीस्वार हर्षदचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या हर्षदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : दुष्काळात तेरावा महिना.! जलवाहिनी फुटून दहा लाख लिटर पाणी वाया

2026-11-22 19:29:07

Pune News : दुष्काळात तेरावा महिना.! जलवाहिनी फुटून दहा लाख लिटर पाणी वाया

Pune News : शहरात अनधिकृत नळजोडांचा सुळसुळाट! अर्ध्या इंचाच्या ठिकाणी एक इंचाच्या जोडण्या

2026-11-22 18:39:34

Pune News : शहरात अनधिकृत नळजोडांचा सुळसुळाट! अर्ध्या इंचाच्या ठिकाणी एक इंचाच्या जोडण्या

Devendra Fadnavis : दुष्काळामुळे वृक्षारोपण मोहीम कमी केली; फडणवीस यांनी केले स्पष्ट

2026-11-22 16:44:49

Devendra Fadnavis : दुष्काळामुळे वृक्षारोपण मोहीम कमी केली; फडणवीस यांनी केले स्पष्ट

Pune News :  कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

2026-11-22 16:29:30

Pune News :  कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

Sanjay Raut: "देशात अनेक प्रश्न असताना, टिपू टिपू किती काळ खेळायचं?" संजय राऊतांचे केंद्र सरकारला आवाहन

2026-11-22 13:01:03

Sanjay Raut: "देशात अनेक प्रश्न असताना, टिपू टिपू किती काळ खेळायचं?" संजय राऊतांचे केंद्र सरकारला आवाहन