pune: काँग्रेस भवनसमोर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
pune:

pune: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडिया असा अवमानकारक उल्लेख केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस भवन येथे आंदोलन केले.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान करणारी भाषा कदापि सहन केली जाणार नाही, सुनेत्रा पवार यांच्या मौनाला कमजोरी समजण्याची चूक कुणीही करू नये, असा इशारा या वेळी देण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, प्रदीप देशमुख, अक्रुर कुदळ, राजलक्ष्मी भोसले, दत्ता धनकवडे, निवृत्ती बांदल, गौरव घुले आणि अमोल बालवडकर आदी उपस्थित होते.
स्व. इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी गुंगी गुडिया म्हणून हिणवले होते. मात्र, त्यांनी आपल्या कर्तृत्वातून टीकाकारांना उत्तर दिले. स्व. डॉ. मनमोहन सिंग यांनीही वैयक्तिक टीकेला आपल्या कामातून उत्तर दिले, त्यामुळे काँग्रेसने इतिहासातून धडा घ्यावा.
ज्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला अशा अवमानकारक टीकेचा सामना करावा लागला, त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशी भाषा वापरणे दुर्दैवी आणि निंदनीय आहे. सुनेत्रा पवार यांचा संयम हीच त्यांच्या नेतृत्वाची ताकद आहे, असा उल्लेख करत निषेध व्यक्त करण्यात आला.





