Dr. Shailesh Pagaria: शिक्षणातून चारित्र्य घडविणाऱ्या कार्याला कौशल्य पुरस्काराचा सन्मान!
Dr. Shailesh Pagaria:

अर्हम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांचा नाशिकमध्ये गौरव
Dr. Shailesh Pagaria: जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ (नाशिक) यांच्या वतीने अर्हम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कौशल्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ (नाशिक) आयोजित व प.पू. श्री प्रीतिसुधाज शिक्षण फंड संचालित कौशल्य पुरस्कार प्रदान समारंभ नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा पुरस्कार मातोश्री कौशल्याबाई मोहनलाल बलदोटा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एम.बी.शुगर्स ॲण्ड फार्मासिटीकल्सचे (मालेगाव) चेअरमन विजयकुमार लोढा यांचे हस्ते डॉ. शैलेश पगारिया यांना देण्यात आला.
यावेळी डॉ. कन्हैयालाल, सचिन-समीर बलदोटा, संघ शिरोमणी संघपती मंगलचंद साखला, उपाध्यक्ष मोहनलाल ब्रह्मेचा, शंकरलाल गांग, सेक्रेटरी जवरीलाल भंडारी, खजिनदार ललित मोदी, प.पू. श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंडाचे खजिनदार विजय बेदमुथा, चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष निरज बोथरा, स्वागताध्यक्ष सुरज मुनोत यांच्यासह संघाचे विश्वस्त, पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयंबिल तपाराधिका, स्वर्ण संघ आराधिका महासतीजी प.पू. डॉ. पुनीतज्योति म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
अर्हम फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षणासोबत चारित्र्य घडवण्याचे कार्य करणाऱ्या डॉ. शैलेश पगारिया यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण पुणे शहरातील जैन समाजात आनंदाचे वातावरण आहे. यावेळी अर्हम फाउंडेशनचे खजिनदार श्रीकांत पगारिया, ट्रस्टी स्वराज पगारिया, राजश्री पगारिया, प्रीती पगारिया, रुषांग पगारिया, पंकज साखला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.





