पुणे : घरगुती वादातून वाघोलीत पत्नीचा खून
Updated On:

पुणे – चाकूने वार करत पत्नीचा खून केल्याची घटना वाघोली गावातील लेबर कॅम्पमध्ये घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
अनु मिर्झा (28, रा. मॅजेस्टिक सोसायटी लेबर कॅम्प, वाघोली) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राजून मिर्झा याला अटक करण्यात आली आहे. तर राजेश पुनाराम मिर्झा (30, रा.वाघोली, मूळ छत्तीसगड) याने फिर्याद दिली आहे. पतीसोबत असलेल्या वादामुळे अनु ही फिर्यादीच्या कुटूंबासोबत वास्तव्यास होती. याचा राग आरोपीस होता. यातूनच त्याने तिचा खून केला.





