Mumbai : सरकारी कार्यालयांना दिवाळीची सुट्टी जाहीर
Mumbai : दिवाळीनिमित्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील सर्व राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना ९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर.

Mumbai : दिवाळी सणानिमित्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत.
२०२६ मध्ये या दोन जिल्ह्यांतील कार्यालयांसाठी यापूर्वी गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशी या सणांना स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, गोपाळकाल्याची ५ सप्टेंबरची सुट्टी शनिवारी आल्याने त्याऐवजी २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाची सुट्टी देण्यात आली होती.
आता दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबरची सुट्टी ही वर्षातील तिसरी स्थानिक सुट्टी ठरणार आहे. हे आदेश मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू असतील.





