Pune: मनसेचे पाण्यात उभे राहून आंदोलन; पाणीगळती रोखण्याची मागणी
Updated On:

पुणे – सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा येथे गेली अनेक दिवसांपासून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ही गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभाग आणि महापालिकेस वारंवार मागणी केल्यानंतरही ठोस कारवाई होत नसल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
या प्रकरणी दोन्ही विभागांचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पाण्यात उभे राहत गांधीगीरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले. तसेच ही गळती न रोखल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक राहुल तुपेरे, पर्वती विधानसभा उपाध्यक्ष नाझ इनामदार, श्रेया नांगरे. प्रवीण सोनवणे, सुरेश पोतदार, बाळासाहेब ढमाले यांनी हे आंदोलन केले.





