Pune : ‘मनसे’ने बंद सिग्नलला लटकवले फलक
Updated On:

वारजे- वारजे वाहतूक विभागला एनडीए रोडवरील बंद असलेले सिग्नल सुरू करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष कैलास महादेव दांगट यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी मनसे स्टाइलने आंदोलन करण्यात आले. बंद असलेल्या सिग्नलवर “मी सिग्नल नव्हे, नुसतचं बुजगावणं’, आहे असे फलक बंद असलेल्या दहा सिग्नलवर लावण्यात आले. वारजे माळवाडी, शिवणे भागातील सिग्नल गेली कित्येक महिने बंद आहेत.





