Pune : विसर्जनाच्या दिवशी सलग 41 तास मेट्रो सेवा सुरू; भाविकांना मोठा दिलासा

Ganeshotsav 2025 | पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक येतात. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशने गणेशोत्सवाच्या काळामध्ये पहाटे 2 पर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच विसर्जनाच्या दिवशी सलग 41 तास मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे पुण्यात आलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावर्षी गणेशोत्सवावेळी पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो सुरू असणार आहे. या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू झाली आहे. ही मेट्रो स्थानकं थेट मानाच्या गणपतीच्या जवळपास आहे. शिवाय, मध्यवर्ती भागात गर्दी जास्त होते, त्यामुळे प्रवाशांना गर्दी टाळून मेट्रोने गणेशोत्सव पाहण्यासाठी जाता येणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील मंडई, कसबा या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी, 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. यामुळे भाविकांना रात्री उशिरापर्यंत गणपतीचे देखावे पाहणे आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होणे सोपे होणार आहे. Ganeshotsav 2025 |
अनंत चतुर्दशीच्या दिवशी दि. 06 रोजी सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी रात्री 11 पर्यंत मेट्रो सेवा 41 तास अखंड सुरू राहणार आहे. Ganeshotsav 2025 |
हेही वाचा:
राधे राधे…! मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीच्या रथाला फुलांची आकर्षक सजावट





