राधे राधे…! मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीच्या रथाला फुलांची आकर्षक सजावट
Updated On:

Ganpati Visarjan 2025 | मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचा विसर्जन मिरवणुकीतील रथ आकर्षक ठरत आहे. तुळशीबाग मंडळाचे यंदा १२५ वे वर्ष आहे. राधे राधेचा फुलांनी सजविलेला आकर्षक रथ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. फुलांनी सजवलेल्या हा रथ मोबाईल मध्ये टिपण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती समोर महिलांचे लेझीम खेळण्यात आले. नववारी साडी परिधान करत महिला यात सहभागी झाल्या आहेत. याशिवाय ढोल-ताशाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला आहे. यंदा त्यांनी साकारलेल्या वृंदावन देखाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. तसेच या मंडळाने देखील विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. यंदाचे या मंडळाचे १२५ वे वर्ष असल्याने सदस्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. Ganpati Visarjan 2025 |





