Pune News : विकेंडमध्ये पुणे मेट्रो मालामाल; दोन दिवसांत तब्बल ८.७७ लाख प्रवाशांचा प्रवास
Pune News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी मेट्रोला मोठी पसंती दिल्याचे समोर आले आहे. शनिवार आणि रविवार या विकेंडच्या दोन दिवसांत तब्बल ८ लाख ७७ हजार ३७७ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.

Pune News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी मेट्रोला मोठी पसंती दिल्याचे समोर आले आहे. शनिवार आणि रविवार या विकेंडच्या दोन दिवसांत तब्बल ८ लाख ७७ हजार ३७७ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यामुळे पुणे मेट्रोला या दोन दिवसांत १ कोटी ११ लाख ७४ हजार ५०८ रुपयांचे उत्पन्न मिळाले. (Pune News)
शनिवारी मेट्रोचा सर्वाधिक वापर झाला. या दिवशी तब्बल ४ लाख ७८ हजार ४७७ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यातून मेट्रोला ६० लाख २५ हजार २७१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. रविवारी ३ लाख ९८ हजार ९०० प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला असून, या दिवशी ५१ लाख ४९ हजार २३७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. (Pune News)
स्वारगेट-पिंपरी मार्गिकेला सर्वाधिक पसंती
दोन्ही मार्गिकांची आकडेवारी पाहता स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मार्गिकेला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळाली. या दोन दिवसांत तब्बल ४ लाख ९८ हजार ७६२ प्रवाशांनी या मार्गिकेचा वापर केला. (Pune News)
पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील मध्यवर्ती भागाला जोडणारी ही मार्गिका असल्याने गणेशोत्सवाच्या काळात तिचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. पुण्याच्या मध्यवर्ती पेठांमध्ये गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रो सोयीचा पर्याय ठरला. Pune News()
वनाज-रामवाडी मार्गिकेवर रविवारी घट
वनाज-रामवाडी मार्गिकेवर शनिवारी मोठी गर्दी होती. शनिवारी या मार्गिकेवर २ लाख ९ हजार ५३९ प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, रविवारी प्रवाशांच्या संख्येत काहीशी घट झाली. रविवारी १ लाख ६९ हजार ७६ प्रवाशांनी या मार्गिकेचा वापर केला. (Pune News)
Pune News : भंगार गोडाऊनवर अग्निशमन दलाची कारवाई; ७ दुकाने-गोडाऊन बंद करण्याचे आदेश
गर्दी, वाहतूक कोंडीमुळे मेट्रोला पसंती
गणेशोत्सवाच्या काळात पुण्याच्या मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यातच वाहतूक कोंडी आणि वाहनतळाची समस्या असल्याने नागरिकांकडून मेट्रोला प्राधान्य दिले जात आहे. (Pune News)
शनिवार-रविवारची सुटी असल्याने सकाळपासूनच शहराच्या विविध भागांतून नागरिक गणपती दर्शनासाठी मध्यवर्ती पुण्यात दाखल झाले. यातील मोठ्या संख्येने नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी मेट्रोचा पर्याय निवडल्याचे दोन दिवसांच्या प्रवासी संख्येतून स्पष्ट झाले. (Pune News)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनाने सेवेचा कालावधी वाढविण्यासोबतच फेऱ्यांची वारंवारिताही वाढविली आहे. त्यामुळे गर्दीच्या काळात मध्यवर्ती पुण्यात जाण्यासाठी मेट्रो नागरिकांसाठी महत्त्वाचा आणि सोयीचा पर्याय ठरत आहे. (Pune News)





