Pune News : भंगार गोडाऊनवर अग्निशमन दलाची कारवाई; ७ दुकाने-गोडाऊन बंद करण्याचे आदेश
Pune News : पुणे शहरातील अनधिकृत 'पेइंग गेस्ट' (PG) आणि हॉस्टेलवर सुरु असलेल्या कारवाईनंतर आता महापालिका अग्निशमन दलाने रहिवासी भागातील अनधिकृत भंगार दुकाने व गोडाऊनविरुद्ध मोर्चा वळवला आहे.

Pune News : शहरातील अनधिकृत पीजी व हॉस्टेलच्या तपासणीपाठोपाठ आता रहिवासी भागात मोठ्या प्रमाणावर भंगार साठविणाऱ्या दुकाने व गोडाऊनवरही महापालिका अग्निशमन दलाने कारवाई सुरू केली आहे. (Pune News)
वडगाव बुद्रुक, नऱ्हे आणि धायरी परिसरात तपासणी करताना अग्निसुरक्षेची कोणतीही व्यवस्था, आवश्यक परवानग्या आणि अधिकृत विद्युत व्यवस्था नसलेल्या सात भंगार दुकाने व गोडाऊनसह १३ पीजी व हॉस्टेल आढळून आले. या आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pune News)
महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने, अग्निशमन अधिकारी प्रभाकर उमाटकर आणि बांधकाम विभागाचे अभियंता विश्वजीत वाघमोडे यांच्या पथकाकडून सलग तिसऱ्या दिवशी ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. (Pune News)
तपासणीदरम्यान काही भंगार दुकाने, गोडाऊन आणि भंगारावर प्रक्रिया करणाऱ्या युनिटमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कागद, पोती, लोखंड, स्टील आणि अन्य ज्वलनशील साहित्याचा साठा आढळला. (Pune News)
बहुतांश ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये हा साठा करण्यात आला असून, ही ठिकाणे रहिवासी भागात असल्याचेही निदर्शनास आले. अरुंद रस्ते, बीडीपी झोन, अग्निशमन यंत्रणेचा अभाव, अनधिकृत विद्युत पुरवठा, ड्रेनेज तसेच बांधकाम व अन्य आवश्यक परवानग्यांचा अभाव आढळून आला. (Pune News)
अनधिकृत आस्थापनांवर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. अग्निसुरक्षेचे नियम आणि आवश्यक परवानग्यांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. (Pune News)
Pune News : वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई ! गावठी पिस्टलसह तरुणाला अटक





