पुणे – पुणे बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय पायगुडे यांनी राजीनामा दिला आहे. पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांनी हा राजीनामा मंजुर केला आहे. दरम्यान ७ जुलै रोजी दिलीप काळभोर यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर १८ जुलै रोजी प्रकाश जगताप यांची सभापती पदी निवड झाली आहे. त्यानंतर आता उपसभापतींनी राजीनामा दिला आहे. संचालक मंडळ आल्यापासून पायगुडे तिसरे उपसभापती आहेत. आता चौथे उपसभापती बाजार समितीला मिळणार आहेत. दरम्यान उपसभापती पदासाठी नानासाहेब आबनावे, शशिकांत गायकवाड आणि मनिषा हरपळे यांची नावे चर्चेत आहेत. १३ सप्टेंबर २०२४ रोजी पायगुडे उपसभापती बनले होते.