Pune : आंबेगावात सुविधांची वानवाच

आंबेगाव बुद्रुक- आंबेगाव बुद्रुक परिसराचा महानगरपालिकेत समावेश होऊन चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी मूलभूत सुविधा मिळत नसताना मिळकतकर मात्र दुपट्टीने वसूल केला जात आहे. गाव समोवशानंतर पुढील पाच वर्षे ग्रामपंचायतीप्रमाणे कर आकारणी करण्यात यावी, असा नियम असता महापालिकेकडून भरमसाठ कर वसुली होत आहे.
आंबेगाव परिसरात सध्या पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेचा टॅंकर येत नसल्याने अनेक गृह निर्माण सोसाट्यांना खासगी टॅंकर मागवावे लागत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. तर, ड्रेनेजलाइन फुटून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. महानगरपालिका कचरा व्यवस्थापनासाठी जवळपास 500 कोटींचे बजेट असताना कचरा व्यवस्थापन होत नाही. गाव समावेशानंतर अडचणी सुटतील असे वाटत असताना अनेक अडचणी कायम आहेत. महापालिकेचा कर भरूनही सुविधा मिळत नसतील तर प्रशासना विरोधात न्यायालयाचे दार ठोठावावे लागेल, अशी नागरिकांचे म्हणणे आहे.





