पुणे : नवरात्र उत्सवनिमित्ताने काशेवाडी भागातील अशोक तरुण मंडळ आणि अण्णा भाऊसाठे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीत परिसरातील शेकडो महिला भक्तिमय वातावरणात आरतीत सहभागी झाल्या. यावेळी भाजपा कसबा मतदारसंघाचे समन्वयक व स्थायी समिती मा. अध्यक्ष हेमंत रासणे, प्रभाग क्रमांक १९ च्या माजी नगरसेविका अर्चना पाटील तसेच भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील उपस्थित होते. या सोहळ्याला अशोक तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काशेवाडीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मंडळाचे यंदाचे हे ५१ वे वर्ष आहे. मागील अनेक वर्षांपासून महिलांच्या हस्ते महाआरतीचा उपक्रम राबविला जातो. नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली. यावर्षी सुमारे चारशे महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. ‘सर्व स्तरातील महिलांना आरतीचा सन्मान मिळावा, त्यानिमित्ताने एकत्र येत उत्सव साजरा व्हावा या हेतूने या उपक्रमाची सुरुवात केल्याचे’ अर्चना पाटील यांनी सांगितले. यंदाही महाआरतीचे आयोजन भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी उपस्थित देवीभक्त महिलांनी या सन्मानाबद्दल मंडळाचे आभार मानले.