\n

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील डी बिल्डिंग मधील टी वन शॉप मधील बंद हॉटेलला आग लागल्याची माहिती अग्निशनम दलालाच्या नियंत्रण कशाला मिळाली. यानंतर येरवडा, धानोरी, हडपसर, आणि भवानी पेठे अग्निशामक दलाच्या केंद्रातील ५ फायरगाड्या व दोन पाण्याचे टँकर पाठविण्यात आले. यापूर्वी मॉल मधील कर्मचाऱ्यानी फायर सिस्टीम सुरु केली होती. ३ वाजून ४५ मिनिटांनी अग्निशामक दलालाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.

\n

यावेळी अग्निशमन दलाच्या १० अधिकारी आणि ५० जवानांनी आग इतरत्र पसरू नये यासाठी सातत्याने पाण्याचा मारा सुरू केला. यावेळी कोरोना पासून बंद असणाऱ्या हॉटेल मधील टेबल, खुर्ची सहित सगळे फर्निचर, इलेकट्रोनिक वस्तुंनी पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात धूर निघाला होता. यावेळी फिनिक्स मॉल मध्ये साधारण तीन ते साडे तीन हजार नागरिक होते. मॉल मधील कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तर मॉल परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते.

\n

जवानांनी पाण्याचा मारा करून ४५ मिनिटात आग आटोक्यात आणली. या आगीच्या घटनेत बंद असणाऱ्या हॉटेल मधील सामान जळून खाक झाल्याने ८० ते ९० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या वतीने देण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

\n

ही कामगिरी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, दांगट, परतूडकर, रामटेके, सोनावणे, वायकर, वानखेडे, पवार, जाधव, यांच्या पथकाने केली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Video: पुण्यातील ‘फिनिक्स माॅल’मधील बंद हॉटेलला आग; फर्निचर, इलेकट्रोनिक वस्तू खाक","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/Phoenix-Marketcity-Mall-in-Viman-NagarPune.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Dnyaneshwar Phad","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pune-fire-on-third-floor-in-phoenix-mall-on-nagar-road-smoke-in-the-area#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/Phoenix-Marketcity-Mall-in-Viman-NagarPune.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/pune-fire-on-third-floor-in-phoenix-mall-on-nagar-road-smoke-in-the-area#webpage","name":"Video: पुण्यातील ‘फिनिक्स माॅल’मधील बंद हॉटेलला आग; फर्निचर, इलेकट्रोनिक वस्तू खाक","url":"https://www.dainikprabhat.com/pune-fire-on-third-floor-in-phoenix-mall-on-nagar-road-smoke-in-the-area","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pune-fire-on-third-floor-in-phoenix-mall-on-nagar-road-smoke-in-the-area#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/Phoenix-Marketcity-Mall-in-Viman-NagarPune.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/pune-fire-on-third-floor-in-phoenix-mall-on-nagar-road-smoke-in-the-area#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/pune-fire-on-third-floor-in-phoenix-mall-on-nagar-road-smoke-in-the-area","name":"Video: पुण्यातील ‘फिनिक्स माॅल’मधील बंद हॉटेलला आग; फर्निचर, इलेकट्रोनिक वस्तू खाक"}}]}}}

Video: पुण्यातील ‘फिनिक्स माॅल’मधील बंद हॉटेलला आग; फर्निचर, इलेकट्रोनिक वस्तू खाक

Updated On:
Video: पुण्यातील ‘फिनिक्स माॅल’मधील बंद हॉटेलला आग; फर्निचर, इलेकट्रोनिक वस्तू खाक

पुणे : नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅलमध्ये मधील तिसऱ्या मजल्यावर बंद असणाऱ्या हॉटेलला शुक्रवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या बंद हॉटेल मध्ये असणारे टेबल, खुर्ची सहित सगळे फर्निचर, इलेकट्रोनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्यानंतर फिनिक्स माॅल परिसरात घबराट उडाली. माॅलमधील ग्राहक आणि व्यावसायिक बाहेर पडल्याने आवारात गर्दी केली होती. मॉल मधील फायर सिस्टीम आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग ४५ मिनिटात आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील डी बिल्डिंग मधील टी वन शॉप मधील बंद हॉटेलला आग लागल्याची माहिती अग्निशनम दलालाच्या नियंत्रण कशाला मिळाली. यानंतर येरवडा, धानोरी, हडपसर, आणि भवानी पेठे अग्निशामक दलाच्या केंद्रातील ५ फायरगाड्या व दोन पाण्याचे टँकर पाठविण्यात आले. यापूर्वी मॉल मधील कर्मचाऱ्यानी फायर सिस्टीम सुरु केली होती. ३ वाजून ४५ मिनिटांनी अग्निशामक दलालाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.

यावेळी अग्निशमन दलाच्या १० अधिकारी आणि ५० जवानांनी आग इतरत्र पसरू नये यासाठी सातत्याने पाण्याचा मारा सुरू केला. यावेळी कोरोना पासून बंद असणाऱ्या हॉटेल मधील टेबल, खुर्ची सहित सगळे फर्निचर, इलेकट्रोनिक वस्तुंनी पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात धूर निघाला होता. यावेळी फिनिक्स मॉल मध्ये साधारण तीन ते साडे तीन हजार नागरिक होते. मॉल मधील कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तर मॉल परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते.

जवानांनी पाण्याचा मारा करून ४५ मिनिटात आग आटोक्यात आणली. या आगीच्या घटनेत बंद असणाऱ्या हॉटेल मधील सामान जळून खाक झाल्याने ८० ते ९० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या वतीने देण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ही कामगिरी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, दांगट, परतूडकर, रामटेके, सोनावणे, वायकर, वानखेडे, पवार, जाधव, यांच्या पथकाने केली.

आणखी संबंधित बातम्या

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

2026-10-07 12:41:42

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

2026-10-07 08:32:01

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

Graduate-Teacher Election: पदवीधर, शिक्षक निवडणूक शेवटच्या दिवशी १५४ अर्ज

2026-10-07 07:22:43

Graduate-Teacher Election: पदवीधर, शिक्षक निवडणूक शेवटच्या दिवशी १५४ अर्ज

October Heat: शहरात ऑक्टोबर हिटचा चटका ; उष्णतेचा पारा ३६ अंशावर

2026-10-07 07:18:12

October Heat: शहरात ऑक्टोबर हिटचा चटका ; उष्णतेचा पारा ३६ अंशावर