Graduate-Teacher Election: पदवीधर, शिक्षक निवडणूक शेवटच्या दिवशी १५४ अर्ज
Graduate-Teacher Election:

Graduate-Teacher Election: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी एकूण १५४ अर्ज आले आहेत. यामध्ये पदवीधरसाठी ८७, तर शिक्षकसाठी ६७ अर्जांचा समावेश आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्र दाखल केले.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या हर्षदा जाधव- देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील, विश्वजित कदम उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे भैय्या माने यांनीही शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष म्हणून पदवीधरसंघासाठी अर्ज दाखल केला. शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी भाऊसाहेब आंदळकर यांनीही पदवीधर मतदारसंघातून अर्ज भरला.





