Pune District: नशायुक्त पान विक्रीवर कारवाई करा

पारगाव : शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकले जाणारे नशायुक्त पान विक्रीवर कडक कारवाईची मागणी दौंड चे आमदार राहूल कुल यांनी अधिवेधनात केली.
एम. डी. अमली पदार्थाची निर्मिती करणारे दोन कारखान्याच्या माध्यमातून कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रात उत्पादन सुरू होते. त्यावर कारवाई झाली असली तरी शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत या अमली पदार्थाचे प्रमाण वाढत आहे.
त्याला आळा घालणे आवश्यक असल्याने ग्रामीण भागात नशायुक्त कटिंग पानाच्या माध्यमातून अमली पदार्थाची विक्री होत आहे. त्यावर निर्बंध आणले नाही तर मोठ्या प्रमाणावर तरुणाई नशेच्या आहारी जाईल. त्यामुळे शासनाने या कटिंग पानावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार कुल यांनी अधिवेशनात केली.
प्रभातकडून प्रकाशझोत
दैनिक प्रभातमधून (दि.२०) फेब्रुवारी रोजी यापूर्वी नशायुक्त पान विक्रीविरोधात जोरदार आवाज उठवला होता. अनेक शालेय विद्यार्थी सुद्धा यामध्ये गुंतले आहेत. अनेक तरुणांना या पानाचे एक प्रकारचे व्यसनच जडले जाते. म्हणून यावर बंदीची मागणी प्रभातमधून केली होती.





