पुणे जिल्हा : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे प्रमाणपत्र वाटप

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना भाजपचे नेते संजय थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.
संजय थोरात म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सर्वसामान्यांसाठी आणली आहे. आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून नि:शुल्क (मोफत) ऑनलाइन फॉर्म या योजनेचा भरला जातो. आत्तापर्यंत 268 फॉर्म भरण्यात आले आहे. त्यापैकी अनेक जणांचे प्रमाणपत्र आले आहे. त्या पात्र लोकांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
या योजनेच्या माध्यमातून आपल्या व्यवसायासाठी 30 हजारपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते. त्याचप्रमाणे पाच दिवसाचे ट्रेनिंग होऊन ट्रेनिंग सर्टिफिकेट सुद्धा मिळते. तसेच टूलकिट घेण्यासाठी 15 हजार रुपयाची राशी दिली जाते. पुढे या व्यवसायाला चालना देण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून उद्योजक घडवण्याचं काम करण्यात येते. काही अडचण समस्या असल्यास आपण जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करा. योग्य ती माहिती देऊन या योजनेचा लाभ आपल्याला मिळवून दिला जाईल. असे थोरात यांनी सांगितले.
प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विनोद शर्मा म्हणाले आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून या योजना आमच्यापर्यंत नि:शुल्क (मोफत) पोहोचवण्याचं काम आपण करता. आपल्यामुळे खर्या अर्थाने या सर्व योजनेचा लाभ आम्हाला मिळतो. यावेळी सोनाली भोर, सुधीर सोमवंशी, विजय सोमवंशी, विनोद शर्मा यांना संजय थोरात यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.





