Pune District : मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद

वडापुरी : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने दीड कोटी सभासद केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन संवाद साधला.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सभासद नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला होता. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातून ही सभासद नोंदणी मध्ये आघाडी घेतली.
दीड कोटी सभासद नोंदणीचा टप्पा पार केल्यानंतर कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ऑनलाईन सव्वाद साधला यावेळी एकाच वेळी बारा लाख कार्यकर्त्यांशी त्यांनी ऑनलाइन संवाद साधला.
यावेळी इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव बाभूळगाव भाटनिमगाव येथील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचासोबत ऑनलाईन संवादात सहभाग नोंदवला. यावेळी राम आसबे, युवराज बोडके, नवनाथ शिंदे सर, नागनाथ देवकर ,ज्योतीराम कुरडे, गणेश गवळी, गणेश पोळ आनंद शिंदे इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.





