Pune District : बारावीच्या परीक्षेला पारगाव केंद्रातून ४७५ विद्यार्थी; इंग्रजी भाषेचा पहिला पेपर शांततेत

पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील श्री संगमेश्वर माध्यमिक व कै. बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक कला, वाणिज्य, विज्ञान विद्यालयात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या लेखी परीक्षेला ४७५ विद्यार्थी बसले.
पारगाव येथील विद्यालयातील इयत्ता बारावी परीक्षा केंद्र क्रमांक- ०१४३ मधील परीक्षा केंद्रात सहा शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण विद्यार्थी ४७५ प्रविष्ट झाले होते. या परीक्षा केंद्रातील सहा शाळा खालीलप्रमाणे आहेत. श्री संगमेश्वर माध्यमिक व कै. बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव, श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिंगवे, पंडित जवाहलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,निरगुडसर, दत्तात्रय वळसे पाटील, उच्च माध्यमिक विद्यालय, दत्तात्रयनगर, पारगाव श्री गुरुदेव दत्त, उच्च माध्यमिक विद्यालय, संविंदणे व छत्रपती शिवाजी विद्यालय धामणी या शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या परीक्षा केंद्राचे उद्घाटन सरपंच श्वेता ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षा केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांना परीक्षा सूचीमधील नियम सांगितले. तसेच बेलचे वेळापत्रक सांगितले. यावेळी परीक्षेसाठी स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव ढोबळे व पारमार्थिक सेवा संघाचे संचालक शांताराम ढोबळे यांनी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेब पडवळ, गणेश पंडीत, आदी मान्यवर व पालक,शिक्षक उपस्थित होते.
विद्यालयात पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे असून विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे, शंभर मीटरच्या परिसरात झेरॉक्स,फॅक्स, इत्यादी, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांंच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार सुनील मोटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. विद्यालयात पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शंभर मीटरच्या परिसरात झेरॉक्स ,फॅक्स, तसेच मोबाईलवर बंदी घालण्यात आली होती. केंद्रसंचालक प्रमोद घाडीगावकर, अरुण गोरडे व उपकेंद्र संचालक मिताली तांबे यांनी केद्रातील परीक्षेचे काम पाहिले.





