Pune district : वळती विविध कार्यकारी सेवा सोसायटीतर्फे १३ टक्के लाभांश

रांजणी – वळती (ता.आंबेगांव) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब उत्तम बोऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १०.३० वाजता विठ्ठल रखुमाई सभामंडपात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी संस्थेचे सचिव सोमेश्वर भागवत यांनी अहवाल वाचन केले. संस्थेचे ११०९ सभासद असून संस्थेचे ७० लाख ३५ हजार भाग भांडवल आहे. संस्थेने १०.५० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेला चालू आर्थिक वर्षात 14 लाख 69 हजार रुपये इतका नफा झाला असून यावर्षी सभासदांना 13 टक्के लाभांश देण्याचे सभेत जाहीर करण्यात आला.
यावेळी शरद सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव लोंढे, संस्थेचे मार्गदर्शक धोंडीभाऊ भोर, उपाध्यक्ष दिनानाथ भोर, संचालक अशोक नाना लोंढे, अशोक खंडागळे, बाजीराव महादू आजाब, निलेश किसन भोर, खंडू तुकाराम गांजवे, भाऊ भिका भोर, बाळशिराम दत्तु भोर, मंगल पंढरीनाथ लोखंडे, शिवाजी कारभारी लोखंडे ,वसंत हरिभाऊ लोखंडे ,गणपत लोंढे, रवींद्र भोर, बाळासाहेब अजाब, कारभारी थिटे, कारभारी गांजवे, पाराजी आगळे, आदी संस्थेचे सभासद उपस्थित होते. माजी अध्यक्ष निलेश भोर यांनी सभासदांचे आभार मानले.





