Bhigwan : विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित
Bhigwan : यावेळी मेघना बंडगर, डॉ. प्रशांत चवरे, दादा थोरात, जावेद शेख, अमृता गायकवाड, सीमा काळंगे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व उपक्रमाचे कौतुक केले.

भिगवण : दिवाळी हा आनंद, उत्साह, प्रेम आणि आपुलकीचा सण. या सणाचा खरा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, या उद्देशाने भिगवणच्या माजी सरपंच दीपिका क्षीरसागर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिगवण येथे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मिठाई व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी अधिक गोड झाली.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांसोबत सणाचा आनंद साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अचानक मिळालेल्या या गोड भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत दीपिका क्षीरसागर यांनी त्यांच्याशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मेघना बंडगर, डॉ. प्रशांत चवरे, दादा थोरात, जावेद शेख, अमृता गायकवाड, सीमा काळंगे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाप्रसंगी आप्पासाहेब गायकवाड, ऍड. सुरज खटके, अमर धवडे, प्रसाद क्षीरसागर, संतोष सवाने, संजय हागारे, शहाजी गाडे, पप्पू भोंग, कपिल लांडगे, राजेंद्र हगारे, संजय शिंदे, सचिन शेलार, निलेश मोरे, सागर जगदाळे, संतोष गायकवाड, अरुण भाई, सागर शिंदे, डॉ. जयश्री गांधी, मुमताज शेख, तृप्ती उंडाळे, सारिका सवाने, औदुंबर हुलगे, असलम मुलानी, गोरख पोंदकुले, नवनाथ सावंत, राजू सोनवणे व शिक्षक, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तुषार क्षीरसागर यांनी तर सूत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले.
दिवाळीचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांसोबत वाटून घेणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी आणि प्रोत्साहनासाठी तसेच समाधानासाठी हा कार्यक्रम आयोजित केला.
-दिपिका क्षीरसागर, माजी सरपंच, भिगवण.





