Manchar : सहकार चळवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार – विवेक वळसे पाटील
Manchar : मंचर (ता.आंबेगाव) येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

मंचर : सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार असून शेतकरी,व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीत सहकारी संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे,असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले.
मंचर (ता.आंबेगाव) येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या क्यूआर संकेतचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आमदार बाबाजी काळे, हिरामण सातकर, शामराव हुलावळे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले, प्रा.राजाराम बाणखेले, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, नगरसेवक वसंतराव बाणखेले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अजय आवटे,संस्थेचे अध्यक्ष यतीनकुमार हुले, उपाध्यक्ष डॉ.संतोष भालेराव, जगदीश घिसे, कैलास बांगर, प्रवीण अजाब, विलास लबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता पोखरकर, संचालक मंडळ, ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यात सहकार चळवळीला बळ मिळाले आहे. संस्थेने २५ वर्षांच्या वाटचालीत सभासदांचा विश्वास संपादन केला असून आधुनिक तंत्रज्ञान,पारदर्शक कारभार आणि ग्राहकाभिमुख सेवेद्वारे प्रगती करावी,अशी अपेक्षा विवेक वळसे पाटील यांनी व्यक्त केली.





