Pune : शासकीय आधार नोंदणी संचाचे ‘पात्र आधार केंद्र’ चालकांना वाटप
Updated On:

पुणे – माहिती व तंत्रज्ञान विभाग मुंबई, यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील शहर विभाग व ग्रामीण विभागा करिता आधार नोंदणी केंद्र देण्याबाबत प्रक्रिया राबविण्यात आली.
जिल्हा प्रशासन पुणे विभाग यांनी लकी ड्रॉ पद्धतीने आधार केंद्रांची निवड केली. आधार केंद्र मिळण्यासाठी एकूण 356 अर्ज आले होते त्यापैकी 122 ठिकाणी आधार संच देण्याचे नियमित करण्यात आले.
त्यापैकी 115 पात्र ठरलेल्या आधार केंद्र चालकांना वडकी येथील शासकीय गोदामामध्ये शासकीय आधार नोंदणी संचाचे वितरण जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आधार पल्लवी घाडगे, तहसीलदार तथा सहाय्यक नोडल अधिकारी आधार अंजली कुलकर्णी ,जिल्हा प्रकल्प अधिकारी मनोज जाधव ,जिल्हा समन्वयक महा आय टी सुशील खोत ,यांच्या हस्ते करण्यात आले.





