Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील दीड महिना फरार असलेला सराईत आरोपी अटक

पुणे – खूनाच्या प्रयत्नातील दीड महिण्यापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. साहिल कांबळे (रा-डायस्प्लॉट, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे
स्वारगेट पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व तपास पथकातील पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे,विजय कुंभार यांना मिळालेल्या खबरेवरुन साहिल कांबळे हा गुलटेकडी येथे येणार होता.
माहिती मिळतास त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली व सदरचा गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तो सिंहगड पोलीस ठाण्यातील एका गुन्हयातही पाहिजे होता.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले , पोलीस खोमणे, साळवे, कांबळे, दळवी, ढावरे, तिटमे, खेंदाड, शेख, गोडसे,मोरे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.





