Pune Crime: शहराच्या मध्यवर्ती भागातून रिक्षा चोरी करणार्‍यास अटक; दोन रिक्षा, 1 दुचाकी जप्त

Updated On:

पुणे – कोंढव्यातील भाग्योदयनगर भागात सापळा रचून समर्थ पोलिसांनी सराईत वाहनचोरास चोरीच्या रिक्षासह अटक केली.  त्याच्याकडून समर्थ, खडक आणि भोसरी पोलीस ठाण्यात दाखल वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून रास्ता पेठ आणि भवानी पेठेतून चोरलेल्या दोन रिक्षा आणि 1 दुचाकी अशी तीन वाहने  हस्तगत केली आहेत. वसिम वाजिदअली अन्सारी (वय 29,रा. भाग्योदयनगर कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

रास्ता पेठेतून काही दिवसांपूर्वी रिक्षा चोरी झाली होती. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. तपास करीत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही चित्रफितींची तपासणी केली. तसेच सदरची रिक्षा चोरी करणारा संशयित व्यक्ती कोंढव्यातील भाग्योदयनगर येथे राहत असल्याची माहिती बातमीदाराकडून पथकास मिळाली. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक निरीक्षक संदिप जोरे, पोलीस हवालदार संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, शुभम देसाई, विठ्ठल चोरमले, निलेश साबळे, हेमंत पेरणे आदींच्या पथकाने कोंढव्यात सापळा लावला.

चोरीला गेलेल्या रिक्षातून आरोपी वसिम जाताना दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये  त्याने ती रिक्षा रास्ता पेठेतून चोरी केल्याची कबुली दिली. समर्थ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे अधिक  तपास केला असता त्याने जुना मोटार थांबा, भवानी  पेठेतून आणखी एक रिक्षा तसेच भोसरी उड्डाणपूलाशेजारील आळंदी रस्त्यावरील माई वडेवाले या दुकनासमोरून एक दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली.
आरोपी वसिम अन्सारी हा सराईत असून त्याच्याकडून 2 रिक्षा आणि1 दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

आणखी संबंधित बातम्या

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

Shiranthi Rajapaksa : श्रीलंकेच्या माजी फर्स्ट लेडी शिरांथी राजपक्षे यांना अटक

2026-10-07 19:17:43

Shiranthi Rajapaksa : श्रीलंकेच्या माजी फर्स्ट लेडी शिरांथी राजपक्षे यांना अटक