Pune Crime | रिक्षाचालकाच झाला लुटारू ; प्रवाशाला मारहाण करून मोबाइल व रोकड लंपास
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – रिक्षाचालकाने साथीदारांसह रिक्षातील तरुण प्रवाशाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल संच, तसेच रोकड असा मुद्देमाल लुटला. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.फिर्यादी लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीत राहायला आहे. तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात असलेल्या उदतपूर गावचा रहिवासी आहे.
दोन दिवसांपूर्वी तो दुपारी पुणे-सोलापूर महामार्गावरुन रिक्षातून निघाला होता. रिक्षात चालकासह चौघे साथीदार हाेते. रिक्षाचालकाने कदमवाक वस्ती परिसरातील एका हाॅटेलजवळ रिक्षा थांबविली. तरुणाला मारहाण करुन त्याच्यकडील मोबाइल संच आणि खिशातील ३५०० रुपये असा मुद्देमाल लुटला. त्यानंतर रिक्षाचालक साथीदारासह फरार झाला. सहायक पोलीस निरीक्षक सोनटक्के तपास करत आहेत.





