Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं ! वनराज आंदेकरनंतर दुसरी हत्या, हडपसर मधील घटना

Pune Crime : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. मात्र खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री नाना पेठेत ही घटना घडली. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्याात येत आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले असून, सामान्य पुणेकर देखील भयभीत झाले आहेत.
मात्र, अश्यातच आणखी एक हत्या झाली असल्याचं समोर आलं आहे. शतपावालीसाठी निघालेल्या पुण्यात फायनस कंपनीत मॅनेजर म्हणून असलेल्या व्यक्तीची हत्या झाली. वासुदेव कुलकर्णी असे या त्या व्यक्तीचे नाव आहे. पुण्यात 24 तासाच्या आत पुन्हा दुसरी हत्या झाली आहे.
पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या गाडीतळावर मध्यरात्री फायनस मॅनेजरची हत्या करण्यात आली. चाळीस वर्षीय वासुदेव कुलकर्णी घरासमोर शतपावली करत होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचे निधन झाले होते.
या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले असून, काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. परंतु अद्याप कोणाला अटक केलेली नाही. वासुदेव कुलकर्णी यांच्या खुनाचे कारण अजून समोर आले नाही. पोलिसांनी हल्लेखोराच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
कोण आहे वनराज आंदेकर ?
पुणे महापालिकेच्या २०१७ मध्ये वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या २००७ आणि २०१२ या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर देखील नगरसेवक होते.





