Nepal Earthquake : नेपाळला ५.६ मॅग्निट्युड क्षमतेच्या भूकंपाचा धक्का !
भूकंपाचे धक्के नेपाळच्या पूर्वेकडील भागातल्या काही जिल्ह्यांमध्येही जाणवले. याशिवाय पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील दार्जिलिंग, जलपायगुडी आणि कूच बेहार या भागांमध्येही जाणवले.

Nepal Earthquake – नेपाळच्या पूर्वेकडील कोशी प्रांताला आज ५.६ मॅग्निट्युड क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी सव्वा ७ वाजण्याच्या सुमारास हा धक्का जाणवला. भूकंप झालेला भाग चीनच्या सीमेला लागून आहे.
भूकंपाच्या या धक्क्यामुळे कोठेही जीवित अथवा मालमत्तेच्या हानीचे कोणतेही वृत्त उपलब्ध झालेले नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी काठमांडूच्या पूर्वेला २७५ किलोमीटर अंतरावरील तापलेचुंग जिल्ह्यातल्या ओलांगचुक गोला भागात होता, असे राष्ट्रीय भूकंप देखरेख आणि संशोधन केंद्राने म्हटले आहे.
युरोपीयन-भूमध्य भूगर्भशास्त्रीय केंद्राने मात्र या भूकंपाची तीव्रता ५.३ मॅग्निट्युड इतकी असल्याचे आणि भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात १० किलोमीटर खोलीवर होता, असे म्हटले आहे.
भूकंपाचे धक्के नेपाळच्या पूर्वेकडील भागातल्या काही जिल्ह्यांमध्येही जाणवले. याशिवाय पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील दार्जिलिंग, जलपायगुडी आणि कूच बेहार या भागांमध्येही जाणवले.






