Vietnam blast : हनोईमधील स्फोटात ६ ठार तर, डझनभर जखमी
पोलीस वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी शोधक उपकरणे आणि काँक्रीटचे स्लॅब उचलण्यासाठी हायड्रॉलिक यंत्रसामग्रीचा वापर करत आहेत.

Vietnam blast : व्हिएतनामची राजधानी हनोईमधील एका खाण्याच्या ठिकाणी आज झालेल्या स्फोटात ६ जण ठार झाले आणि डझनभर लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट गॅस लीकमुळे झाला असल्याचा संशय आहे.
हनोईमध्ये पहाटे झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले. खिडक्यांच्या काचा फुटल्या, भिंतींना तडे गेले आणि धातूचे शटर चौकटीतून उखडले गेले, तर पत्र्याची छपरे आणि ताडपत्री कोसळल्या. स्फोटामुळे शेजारच्या अपार्टमेंट इमारती हादरल्या, तसेच रस्त्यावर सर्वत्र ढिगारा पसरला, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
स्फोट झाला तेव्हा उपाहारगृह गर्दीने भरलेले होते. त्यामुळे ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी शोधक उपकरणे आणि काँक्रीटचे स्लॅब उचलण्यासाठी हायड्रॉलिक यंत्रसामग्रीचा वापर करत आहेत.
या स्फोटामुळे हादरलेल्या इमारती धोकादायक बनल्या असल्यामुळे प्रशासनाकडून रहिवाशांना दुसरीकडे स्थलांतरित केले जाऊ लागले आहे. हनोई पोलिसांनी या स्फोटाता तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या एका व्यक्तीसह १४ हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.






