Pune Crime News : सराईत अल्पवयीन तरूणावर जीवघेणा हल्ला; १० ते १२ जणांकडून वार
Pune Crime News : परिसरात काही काळ तणावाचे वातावरण
Updated On:

पुणे – कात्रज परिसरातील कट्टा हॉटेलसमोर सोमवारी (दि. २० ) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास एका १६ वर्षीय सराईत अल्पवयीन मुलावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची प्राथमिक माहिती मिळत असून हल्ल्यात अल्पवयीन गंभीर जखमी झाला आहे.
त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.





