Pune Agreement Centenary: पुणे करार शताब्दीसाठी पालिकेचा पुढाकार
Pune Agreement Centenary:

ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन, संशोधन, जनजागृतीवर भर
Pune Agreement Centenary: महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेल्या ऐतिहासिक पुणे कराराच्या शताब्दी वर्षानिमित्त (२०३२) पुणे महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कराराशी संबंधित ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन, संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवाद, स्मृतिग्रंथ आणि जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पुणे कराराचा इतिहास, त्यामागील सामाजिक भूमिका आणि महात्मा गांधी व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे असा प्रस्ताव नगरसेवक सुहास टिंगरे यांनी मांडला होता.
त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. येरवडा कारागृह परिसरातील रस्त्याला पुणे करार स्मृती मार्ग असे नाव देण्याची सूचनाही प्रस्तावात आहे.





