Archana Puran Singh : अर्चना पूरन सिंह यांनी बॉलीवूडबाबत व्यक्त केली खंत; “१० वर्षे उलटून गेली, पण….”
Archana Puran Singh : अर्चना पूरन सिंह ‘द कपिल शर्मा शो’ मधून घराघरात पोहचल्या

Archana Puran Singh : बॉलीवूड अभिनेत्री अर्चना पूरन सिंह यांनी ९० च्या दशकात त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्येकाम केले आहे. आपल्या अभिनयाची त्यांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र अपेक्षित असलेले काम न मिळाल्याची आणि गेल्या 10 वर्षात कोणत्याही चित्रपटात काम न मिळल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.
एका मुलाखतीमध्ये अर्चना यांनी सांगितले की, “‘बोल बच्चन’ प्रदर्शित झाल्यानंतर अनेक चित्रपट समीक्षकांनी मला फोन करून सांगितले की, आता मला चित्रपटांच्या ऑफर्स येतील. मी त्यांना गंमतीने म्हणाले की, पहिली ऑफर येताच मी त्यांना फोन करेन. पण १० वर्षे उलटून गेली आणि मला त्यांना फोन करण्याची संधीच मिळाली नाही. या १० वर्षांत मला एकाही चित्रपटाची ऑफर आली नाही. आमची इंडस्ट्री खूपच विचित्र आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “माझे युट्युब व्हिडीओ प्रेक्षकांना आवडतात आणि ते व्हायरलही होतात. त्यामुळे मला ब्रँड एंडोर्समेंटचे ऑफर्स येतात, पण अभिनयाच्या ऑफर्स अजूनही येत नाही. ‘टोस्टर’ सिनेमानंतरही माझ्याकडे चित्रपटांच्या ऑफर्सची काही रांग लागलेली नाही. मला पुन्हा एकदा सर्व चित्रपट निर्मात्यांना सांगायचं आहे की, मला अभिनय करायचा आहे. मात्र आपल्या इंडस्ट्रीची कामाची पद्धत खूपच वेगळी आहे आणि हेच कदाचित इंडस्ट्रीचे वास्तव आहे.”
सिनेमाच्या ऑफर न येण्याचं कारण देखील अर्चना पूरन सिंह यांनी सांगितले की, “मी टीव्ही शो करीत असल्यामुळे निर्मात्यांचा असा समज झाला आहे की, मी चित्रपटाच्या शूटिंगसाठी वेळ देऊ शकणार नाही. खरं तर त्यांचं म्हणणं काही प्रमाणात योग्यही होतं. कारण टीव्ही शो करत असताना मला चित्रपटांची ऑफर्स आली, पण मी १५ दिवसांसाठी स्कॉटलंडला शूटिंगला जाऊ शकत नव्हते, त्यामुळे त्या स्वीकारता आल्या नाही,” असेही अर्चना यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अर्चना पूरन सिंह यांनी ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ अशा टीव्ही व ओटीटी शोमध्ये काम केलं आहे. Archana Puran Singh
हेही वाचा:






