Pune Crime | पर्वतीत पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला अटक ; दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त
Updated On:
प्रभात वृत्तसेवा
पुणे – दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पर्वती पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तूल, चार मॅगझीन, दोन काडतुसे जप्त केली. ओंकार दीपक जाधव ( २२, रा. साईसिद्धी चौक, आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. पर्वती भागात पाेलीस कर्मचाीर महेश मंडलीक, सद्दाम शेख गस्त घालत असताना जाधवकडील पिस्तूलची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. जाधवने पिस्तूल काेणाकडून आणले, याचा तपास करण्यात येत आहे.पर्वतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, प्रकाश मरगजे आदींनी ही कामगिरी केली.





