Wagholi News : पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; तीन तरुणांचा मृत्यू, दोघे जखमी
Wagholi News : पुणे-नगर महामार्गावरील वाघोली येथील कटकेवाडी-विठ्ठलवाडी कमानीजवळ चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे जण जखमी झाले आहेत.

Wagholi News : पुणे-नगर महामार्गावरील वाघोली परिसरात सोमवारी (दि. २३) मध्यरात्री भीषण अपघात झाला. कटकेवाडी-विठ्ठलवाडी कमानीजवळ भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार प्रथम रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. (Wagholi News)
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास हा अपघात घडला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर ती वाघोलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान झाले. (Wagholi News)
या दुर्घटनेत ओमकार अजय सूर्यवंशी (वय २४), शंकर वासुदेव ढोळे (वय २२) आणि कारचालक मयूर सतीश औटी (वय २६) यांचा मृत्यू झाला. तर आशुतोष नंदकुमार मरकड (वय २८) आणि प्रणय भरत शिंदे (वय २४) हे दोघे जखमी झाले आहेत. (Wagholi News)
मृत आणि जखमी झालेले सर्वजण वाघोली परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघाताची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली असून तरुणांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Wagholi News)
Wagholi News : वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा
Wagholi News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाघोली आणि परिसरातील गावात ५ ठिकाणी आगीच्या घटना





