Pune Crime : जागा देण्याच्या नावाखाली डॉक्टरला २४ लाखांना गंडवले ; माजी नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सार्वजानिक सेवेसाठी राखीव भूखंड (ॲमिनेटी स्पेस) मिळवून देण्याच्या आमिषाने महंमदवाडीतील एका डॉक्टरांची २४ लाखांची फसवणूक केल्याबद्दल माजी नगरसेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत डाॅ. महेंद्र धोंडीराम सुरवसे ( ३९, रा. महंमदवाडी) यांनी फिर्याद दिली असून माजी नगरसेविका प्राची आल्हाट, त्यांचे पती अशिष आल्हाट, चिंतामणी कुरणे (रा. महंमदवाडी) आणि आसिफ शेख (रा. मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ दरम्यान हा प्रकार घडला असून फिर्यादीनुसार डाॅक्टरांचे महंमदवाडीत रुग्णालय आहे. आरोपींनी ॲमिनेटी स्पेस आणि पालिकेची परवानगी मिळवून देतो, असे सांगतून २५ लाखांची मागणी केली. आरोपींवर विश्वास ठेवून डॉक्टरांनी पत्नीच्या, मित्राच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने २४ लाख २० हजार रुपये दिले. मात्र, ठरलेली जागा न दिल्याने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.





