Pune Crime : काम सोडून गेल्यानंतर 6 महिन्यांनी मोलकरीणीनं ‘साफ’ केलं मालकाचं घर; दोघींना अटक

Updated On:

पुणे – काम सोडून गेलेल्या मोलकरीनेकडे घराची चावी तर नाही ना… एखदा तपासून पहा… कारण काम सोडल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी घरातील लोक बाहेरगावी गेल्यानंतर विद्यमान मोलकरणीच्या मदतीने घरफोडी करत 10 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचे उघड झाले आहे.

शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी येथील मोदीबाग येथे घडलेल्या गुन्हाचा छडा पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषण करून लावला. जुन्या-आता काम करणाऱ्या दोन्ही मोलकरणीला गजाआड केले. चिंचवड भागात राहणारी जुनी 30 वर्षीय, वारजे माळवाडी भागात राहणारी सध्याच्या 26 वर्षीय मोलकरणीला अटक करण्यात आली आहे.

26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत घडलेल्या घटनेबाबत 63 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे कुटुंबिय देवदर्शनाला गेले होते. त्यामुळे या कालावधीत घर बंद होते. याबाबतची माहिती सध्या काम करणाऱ्या मोलकरणीने जुन्या मोलकरीणीला फोन करून दिली. तिने सहा महिन्यापूर्वी काम सोडले होते. तरीही तिच्याकडे घराची चावी होती. ती चावी घेऊन जुनी मोलकरीन घरात गेली.

घरफोडी करून लंपास झाली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, संशियित महिलांची सीडीआरवरून पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले.

शिवाजीनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलिमा पवार, पोलीस निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे, हवालदार आरीफ आतार, बशीर सय्यद, रणजित फडतरे, पोलीस नाईक दिलीप गोरे, सतिश कुंभार, शिपाई विजय मोरे, अशोक शिरकांडे, सागर रासकर, शरद राऊत, महिला पोलीस शिपाई अर्चना डवरे, चित्रा वीर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आणखी संबंधित बातम्या

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

2026-10-07 12:41:42

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर