Pune : ‘बाशिम’ गावात लहानग्यांनी अनुभवली ग्रामीण संस्कृती

Updated On:

पुणे : चावडीवर दोघा भावांतील तंटा सोडवणारे पंच, गावाला जागे करणारे वासुदेव, विहीर व हातपंपावर पाणी भरणाऱ्या बाया, कावडीतून पाणी वाहून नेणारे पुरुष, टुमदार घरे, बारा बलुतेदार, हिरवीगार शेती, गावाचा बाजार, जत्रा अन बैलगाडी अवतरली थेट भांडारकर रस्त्यावरील डेक्कन जिमखान्याच्या ‘बाशिम’ गावात!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सोमवारी पुण्याच्या मध्यवर्ती भागात ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृती अवतरली. भांडारकर रस्त्यावरील मएसो बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दी पूर्ती वर्षानिमित्त खास दोन दिवसांच्या ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणारे ‘बाशिम’गाव साकारण्यात आले होते. शिशुनिकेतन व चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे.

या बाशिम गावात ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, पाटलांचा वाडा, कौलारू घरे, मंदिरे, चावडी, शेती व त्यासाठी अवजारे, बाजारहाट, जत्रा, बैलगाडी, गोठा, न्हावी-सुतार-कुंभार-लोहार यासारखे बारा बलुतेदारी करणारे ग्राम व्यवसाय आदी साकारण्यात आले आहे. गावातील भजन-कीर्तन, पालखी सोहळा, लोककला व संस्कृतीचे सादरीकरण लक्षवेधी आहे. बैलगाडीची मनसोक्त रपेट मारून झाल्यावर लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलते.

याबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण म्हणाल्या, “शाळेने 101 व्या वर्षात पदार्पण केले असून, त्यानिमित्ताने वर्षभर मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्याचे एकत्रित सादरीकरण या दोन दिवसात झाले आहे. दुरून दिसणारे आणि गावाच्या अंतरंगात काय काय सामावले आहे, याचे दर्शन यातून घडते. मुलांना गाव, तेथील संस्कृती, रचना, विविध घटक यासह रानमेव्याची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमात 1ली ते 4 थी या वर्गातील सर्व मुले, त्यांचे शिक्षक व पालक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.”

आणखी संबंधित बातम्या

Panshet Drowning : मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची! पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत

2026-05-26 05:00:18

Panshet Drowning : मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची! पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत

Pune Curfew : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी; नेमके काय असणार निर्बंध? जाणून घ्या...

2026-05-25 11:31:34

Pune Curfew : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी; नेमके काय असणार निर्बंध? जाणून घ्या...

Pune News : 'आयसीएआय'च्या दीक्षांत सोहळ्यात 650 स्नातकांना पदवी

2026-05-24 05:00:33

Pune News : 'आयसीएआय'च्या दीक्षांत सोहळ्यात 650 स्नातकांना पदवी

Pune News : रस्त्यावर केक कापणे माजी नगरसेवकाला पडले महागात; गुन्हा दाखल

2026-05-24 04:45:47

Pune News : रस्त्यावर केक कापणे माजी नगरसेवकाला पडले महागात; गुन्हा दाखल

Vishwajeet Kadam : दोन्ही शहराध्यक्ष कॉंग्रेसला उभारी देणार; विश्वजीत कदम यांचे प्रतिपादन

2026-05-24 04:45:01

Vishwajeet Kadam : दोन्ही शहराध्यक्ष कॉंग्रेसला उभारी देणार; विश्वजीत कदम यांचे प्रतिपादन