Pune : गाड्यांची तोडफोड प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; येरवडा पोलिसांनी काढली धिंड

पुणे – येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मी नगर परिसरात दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ७०६/२०२५ नुसार भा.न्या.सं. (BNS) कलम ११८, १८९(२), १९१(२) तसेच हत्यार कायदा कलम ३, ७ आणि क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी
मुस्ताफा बशीर बेपारी ( १९ )
सैफ अली अझिमुद्दीन शेख (२१ )
तसेच याच गुन्ह्याशी संबंधित गुन्हा क्रमांक १८३/२०२५, कलम ११७(२), ११५(२) इत्यादी बीएनएस ३(१)(ii), ३(२), ३(४) मोक्का कायद्यानुसार आरोपी करण खंडेराव कुंभार (२३ ) यालाही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीसांनी घटनास्थळाला भेट देऊन सखोल तपास सुरू केला असून गुन्ह्यातील इतर पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके (येरवडा पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.





