Pune and Pimpri Chinchwad : पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
Pune and Pimpri Chinchwad : राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापाैर पदाच्या आरक्षणाची सोडत देखील जाहीर झाली आहे. अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी 8 आणि सर्वसाधारण 17 प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आलंय.

Pune and Pimpri Chinchwad | राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापाैर पदाच्या आरक्षणाची सोडत देखील जाहीर झाली आहे. अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी 8 आणि सर्वसाधारण 17 प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आलंय. आता महापाैर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महापालिकांवर भाजपाची सत्ता आहे. यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका देखील भाजपाकडे आहे. याचदरम्यान आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसाठी सर्वसाधारण महिला वर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
दरम्यान, महापाैर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. आता राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. आरक्षण स्पष्ट झाले असून पुणे महापालिकेचे महापाैर सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे. आता खुला प्रवर्ग निघाल्याने येथे कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिला नगरसेविकांची नावे चर्चेत
पुणे महानगर पालिकेसाठी महापौरपदासाठी भाजपकडून ५ महिला नगरसेवकांची नावे आघाडीवर आहेत. त्यामध्ये रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे यांच्या नावाचा समावेश आहे. मा मंजुषा नागपुरे यांनी यंदाच्या महापालिकेत बिनविरोध विजय मिळवला होता. रंजना टिळेकर या आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत त्यांची ही सहावी टर्म आहे. त्यामुळे त्यांचेही नाव महापौरपदासाठी जोरदार चर्चेत आहे.
पुणे महापालिकेत यापूर्वी २०१२ आणि २०१७ या निवडणुकांमध्ये महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण होते. मात्र, यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. यामुळे महापालिकेच्या नेतृत्वात महिला सत्तेची संधी निर्माण झाली आहे. Pune and Pimpri Chinchwad |
हेही वाचा:
Mayor Reservation | तुमचा महापौर कोण? मुंबईसह २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर






