Ajit Pawar And Sharad Pawar | महापालिका निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपचे कमळ शहरात फुलवत भाजपला संधी दिली आहे. यातच आता सत्ताधारी महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचे राजकीय स्थान आणखी भक्कम बनले आहे. मात्र निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीतील त्यांच्या ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पुण्यातील धक्कादायक निकालानंतर दोन्ही नेत्यांमध्ये होणारी ही पहिलीच भेट आहे. ही भेट कौटुंबिक नसून यामागे काही मोठे राजकीय संकेत दडलेले आहेत का? असा सवाल आता केला जात आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भविष्यातील वाटचालीवर किंवा महापालिकेत मिळून विरोधी पक्ष म्हणून काम करण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आता अजित पवार आणि शरद पवार पक्ष एकत्र येण्याची देखील शक्यता आहे. यावेळी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे देखील उपस्थित आहेत. Ajit Pawar And Sharad Pawar | तसेच राज्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आहेत. यामुळे भाजपला टक्कर द्यायची असेल, अस्तित्व टिकवायचे असेल तर दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याची चर्चा देखील आता रंगली आहे. Ajit Pawar And Sharad Pawar | राष्ट्रवादीला अपेक्षित यश नाही दरम्यान, महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शहरात राजकीय गोंधळाचे वातावरण दिसत होते. महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच लढत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्र निवडणूक लढवली. मात्र दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला अपेक्षित असे यश मिळवता आले नाही. Ajit Pawar And Sharad Pawar | हेही वाचा: प्रभाग ३३ मध्ये राष्ट्रवादीचे २, तर भाजपचे २ उमेदवार विजयी; पण ‘या’ पराभवाने समर्थकांना बसला धक्का