Pune : थंडीमुळे हवा प्रदूषण पातळीत झाली वाढ

Updated On:
Pune : थंडीमुळे हवा प्रदूषण पातळीत झाली वाढ

पुणे – थंडीमुळे हवेच्या प्रदूषणाची पातळी वाढली असून, धुलीकण हवेतच स्थिर राहिल्याने श्वसनासंबंधीच्या तक्रारी वाढल्या आहेत. दम्याच्या रुग्णांचाही त्रास वाढला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीची चाहूल लागली असून, पहाटे धुके दाटत आहे. त्यामध्ये धुराचे प्रमाण दिसत असल्याने सकाळी हवेत धुरकटपणा दिसून येत आहे. दवांबरोबरच्या धुलीकणांमुळे हवा प्रदूषण निर्माण होत आहे. हे धुलीकण हवेतच अडकून राहात असल्याने हे प्रदूषण जास्त होते.

याशिवाय विद्यापीठ चौक, आळंदी, निगडी आणि भोसरी या भागांत प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे श्वसनाचे विकार वाढले असून, खोकला, दमा या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातून ऋतू संक्रमणामुळेही आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, संधिवात असलेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, थंडीचा जोर आणखी वाढणार असून, श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ