Maharashtra Police : मोठी बातमी..! राज्यातील ‘या’ शहरात 14 दिवसांची जमावबंदी लागू; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या..
Maharashtra Police : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Maharashtra Police : पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 37 (1) आणि (3) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. (Maharashtra Police)
हा आदेश 10 जून 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून लागू होणार असून 23 जून 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यास तसेच पूर्वपरवानगीशिवाय सभा आणि मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. (Maharashtra Police)
जमावबंदीच्या काळात दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, भाले, तलवारी, काठ्या किंवा इजा पोहोचवू शकणाऱ्या वस्तू सोबत ठेवणे प्रतिबंधित असणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिमांचे प्रदर्शन किंवा दहन करणे, मोठ्याने घोषणाबाजी करणे, वाद्य वाजविणे आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशी कृत्ये करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. (Maharashtra Police)

Maharashtra Police : मोठी बातमी..! राज्यातील ‘या’ शहरात 14 दिवसांची जमावबंदी लागू; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या..
याशिवाय राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल अशी भाषणे, प्रचार साहित्य किंवा अन्य सामग्रीचा प्रसार करण्यासही मनाई करण्यात आली आहे. (Maharashtra Police)
मात्र, हा आदेश शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींना तसेच कर्तव्याच्या अनुषंगाने शस्त्र बाळगण्यास अधिकृत परवानगी असलेल्या व्यक्तींना लागू होणार नाही. पोलिस प्रशासनाने नागरिकांना आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 135 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Police)





