PKL 2025 : पुणेरी पलटनला सचिनची ‘ती’ चूक पडली महागात, दबंग दिल्लीने गोल्डन रेडमध्ये मारली बाजी, पाहा VIDEO

PKL 2025 Updates : गुरुवारी विशाखापट्टणम येथील विश्वनाथ स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या थरारक सामन्यात दबंग दिल्लीने पुणेरी पलटनवर गोल्डन रेडमध्ये मात करत शानदार विजय मिळवला. या सामन्यादरम्यान प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच गोल्डन रेड पाहायला मिळाली. दबंग दिल्लीचा कर्णधार आशु मलिकने या हंगामातील आणखी एक सुपर 10 पूर्ण केला. सामना 28-28 अशा बरोबरीत संपल्यानंतर तो टाय-ब्रेकरपर्यंत गेला.
पुणेरी पलटनने जोरदार सुरुवात –
हंगामाच्या सुरुवातीपासूनच शानदार फॉर्ममध्ये असलेल्या पुणेरी पलटनने सामन्याला जोरदार सुरुवात केली. त्यांनी उत्कृष्ट बचावात्मक खेळासह 2-0 अशी आघाडी घेतली. दबंग दिल्लीने फझल अत्राचलीच्या टॅकलच्या जोरावर प्रत्युत्तर देत सामन्यातील पहिला गुण मिळवला. पहिल्या 10 मिनिटांत दोन्ही संघांमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली, आणि दोन्ही संघांनी आलटून पालटून गुण मिळवले.
2️⃣/2️⃣! Dabang Delhi powered up with a Golden Raid 🔥💙
Watch the full highlights on our YouTube channel 📹#ProKabaddi #PKL12 #PuneriPaltan #DabangDelhiKC pic.twitter.com/pGLNvIJvwH
— ProKabaddi (@ProKabaddi) September 5, 2025
पहिल्या टाइमआउटपर्यंत दबंग दिल्लीने 8-6 अशी थोडीशी आघाडी घेतली होती. पुणेरी पलटनने सुपर टॅकलच्या माध्यमातून स्कोअर 8-8 असा बरोबरीत आणला. मात्र, पहिल्या सत्राच्या शेवटच्या चार मिनिटांत आशु मलिकच्या सुपर रेडमुळे दिल्लीने 12-10 अशी आघाडी मिळवली. कर्णधाराने ही आघाडी कायम राखत स्कोअर 18-11 पर्यंत नेला. पुणेरी पलटनने काही गुण मिळवले, परंतु पहिल्या सत्राअखेर दिल्ली 18-13 ने पुढे होती.
हेही वाचा – ENG vs SA : टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास, २७ वर्षांनी इंग्लंडला चारली धूळ
पुणेरी पलटनचे दुसऱ्या सत्रात शानदार पुनरागमन –
दुसऱ्या सत्रात पुणेरी पलटनने शानदार पुनरागमन करत स्कोअर 17-19 असा आणला. फझल अत्राचलीच्या एका चुकीमुळे पुनेरी पलटनला आणखी एक गुण मिळाला आणि स्कोअर 18-19 झाला. त्यानंतर लगेचच पुणेरी पलटनने दबंग दिल्लीला ऑलआउट करत 22-21 अशी आघाडी घेतली. ही लय कायम राखत त्यांनी आघाडी 24-21 अशी वाढवली. सामना पुणेरी पलटनच्या नियंत्रणात असल्याचे वाटत असतानाच दबंग दिल्लीने जोरदार पुनरागमन केले.
पुणेरी पलटनला सचिनची चूक पडली महागात –
POV: The most aggressive season ever 🤯#ProKabaddi #PKL12 #PuneriPaltan #DabangDelhiKC pic.twitter.com/w8vLfR7Y7A
— ProKabaddi (@ProKabaddi) September 5, 2025
नीरज नरवालच्या यशस्वी रेड आणि मजबूत बचावात्मक खेळामुळे स्कोअर 24-26 असा झाला. शेवटच्या क्षणांपर्यंत सामना अतिशय चुरशीचा राहिला. शेवटच्या मिनिटात दबंग दिल्लीने स्कोअर 27-28 असा केला. मात्र, त्यानंतर त्यांनी पुनेरी पलटनच्या सचिन तन्वरला बॉल्क लाइन ओलांडू दिली नाही. सचिनची ही चूक पुणेरी पलटनसाठी चांगलीच महागात पडली. ज्यामुळे सामना 28-28 अशा बरोबरीत पोहोचला आणि टाय-ब्रेकरची वेळ आली.
गोल्डन रेडमध्य दबंग दिल्लीने मारली बाजी –
Ashu Malik wins Dabang Delhi K.C.’s first-ever Golden Raid 🤯#ProKabaddi #PKL12 #GhusKarMaarenge #DabangDelhiKC pic.twitter.com/hjf3reJoNe
— ProKabaddi (@ProKabaddi) September 5, 2025
टाय-ब्रेकरमध्ये दोन्ही संघांमध्ये प्रत्येक गुणासाठी कडवी झुंज पाहायला मिळाली. रेड्स संपल्यानंतर दोन्ही संघ 5-5 अशा बरोबरीत होते, आणि सामना गोल्डन रेडपर्यंत गेला. यावेळी कर्णधार आशु मलिकने संयम राखत गौरव खत्रीविरुद्ध टच पॉइंटसह एक अतिरिक्त गुण मिळवला. या प्रभावी गोल्डन रेड आणि त्याच्या सुपर 10 च्या जोरावर दबंग दिल्लीने विजय खेचून आणला आणि सामन्याचा थरारक अंत झाला.





